रविदास महाराजांच्या शिकवणी प्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकमेकांशी पे्रमभावनेने रहावे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. कुणाचीही तक्रार असल्यास त्यांनी आपल्यापर्यंती ती निर्भिडपणे मांडावी. ...
रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे. ...
पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. ...
यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. यातच शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
देशात आज अनेक समस्या डोके वर काढत असताना त्यांची झळ सर्वच समाजांना पोहोचत आहे. आर्थिक कोंडी, उपवर मुला-मुलींचे विवाह, परस्परांपासून दुरावलेली मने, शैक्षणिक समस्या, समाज एकत्रिकरण आदी अनेक समस्या आहे. ...
बहार नेचर फाऊंडेशनतर्फे पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना नाविण्यपूर्ण बक्षिसांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी घडवून वन्यजीव निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेद्वारे विविध प्रकारे कार्यवाही केली जाते. याचा वाहन धारकांना त्रास होत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलू ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंच ...
येथील जागृती क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार डॉ. शरद काळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम पारितोषिक नागपूर रेंज पोलिसांच्या चमूने तर महिला गटाचे प्रथम पारितोषिक वर्धा पोलीस चमूने पटकावले. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयासह राज्याच्या विविध भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना गत सहा महिन्यांपासून औषधीची खरेदी बाहेरूनच करावी लागत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांना होणारा औषधीचा पुरवठा हा काही ठराविक स्वरूपाचाच करण्यात ये ...