शासनाच्यावतीने प्रत्येक घर धुरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अनेक शिबिर आणि मेळावे झाले. असे असताना अद्यापही ग्रामीण भागात चुलीचा धूर निघत आहे. ...
दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे ...
जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली. ...
गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने रविवारच्या सुट्टीचा आनंद लोकांनी ठिकठिकाणी श्रमदान करून लुटला. आर्वी तालुक्यातील बोदड येथील टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, आपले सरकार इत्यादी स्वयंसेवी संघटनांनी तसेच ...
येथील आसोले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होताना दिसते. ...
जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाचे तुफान आल्याचे दिसत आहे. वर्धेत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनाही या कामांत सहभागी होत असल्याचे दिसत आहे. ...
दारूच्या गुन्ह्यातील आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाताला झटका देत सिनेस्टाईल पसार झाला होता. त्याला समुद्रपूर पोलिसांनी २४ तासांत हैदराबाद येथून अटक केली. ...
वर्धा शहरातील बॅचलर रस्त्याचे नुकतेच रूंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून आता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...