स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. ...
महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे. ...
महावितरणकडून नागपूर परिमंडलात सुरु असलेल्या विविध विकास कामामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्तेत सुमारे १७१ कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. यात वर्धा जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांनी महावितरणची मालमत्ता वाढली आहे. ...
सर्वसामान्यांना अत्यल्प मोबदल्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविधा इमारतीच्या आवारात ‘वॉटर एटीएम’ सुरू करण्यात आले. या एटीएमची सर्वसामान्यांना विशेष माहिती नसली तरी या भागात रात्रीला रंगणाऱ्या दारू पार्टीत सहभागी होणाऱ्यांना ...
पोटच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या नराधम बापास जिल्हा न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेप ठोठावली. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी शनिवारी दिला. ...
येथील विकास चौक परिसरातील सचिन खोडे याच्या घरी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत १ लाख १८ हजार २७० रुपये जप्त करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली. ...
शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही. ...
अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ...
किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. ...