नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य भाजीबाजारातून भाज्या आणताना सर्वाधिक प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग केला जातो. परंतु बंदीमुळे प्लास्टिक पिशव्यांवर संक्रांत आली. त्यामुळे नायलॉन पिशव्या विकण्याचा नवा उद्योग भाजीबाजार परिस ...
दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही. ...
धुळे जिल्ह्यात नाथजोगी भिक्षुकी भटक्या जमातीमधील पाच जणांची हत्या करणाºयांविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धा जिल्हा भटक्या जमाती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व या हत्यांचा निषेध करण्यात आला. ...
संगनमत करून महिला बचत गटाची नोंदणी न करता बचत गटाच्या नावावर स्त्रियांना जास्त व्याज व लाभांशाचा परतावा करण्याचे खोटे आश्वासन देवून रक्कम गुंतविण्यास लावून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणात आरोपी माया महेंद्र अग्रवाल व महेंद्र मदनलाल अग्रवाल या दोघांना ...
राज्यशासनाच्या १ लक्ष १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टाला पूर्ततेकडे नेण्यासाठी गोदिंया जिल्ह्यातून प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडीचे वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी या दिंडीचे वर्धा जिल्ह्यात आगमन झाले. ...
आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच १८ जुलै रोजी नागपूर विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना रक्तदान करून वर्धेकरांनी आदरांजली वाहिली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय, लोकमत वृत्तपत्र समूह, युवा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ...
पढेगाव येथील शेतकरी अरविंद तडस यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र त्यांनी पेरलेले वाण उगवले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वर्धा यांच्याकडे केली आहे. ...
जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे. ...