आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे. शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे. ...
वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वत्र वाळू चोरी सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय पथकाने देवळी तालुक्यातील दिघी (बोपापूर) व सानेगांव (बाई) या दोन्ही गावातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रावर धडक दिली. ...
जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, जागरूक व देशभक्तीने भारवलेल्या नागरिकांची नितांत गरज आहे. यासाठी एनसीसीचे सैनिकी प्रशिक्षण तरूण तरूणींना आवश्यक केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...
स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण ...
नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू ...
वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. ...
स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्य ...