शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे. ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा व निकालांचा हवाला देऊन, विद्यापीठ अनुदान आयोग, मानव संसाधन मंत्रालयाने यापूर्वीचे मागासवर्गीय आरक्षणांसाठी असलेले २०० पॉर्इंटचे रोस्टर रद्द केलेले आहे. रोस्टरच्या या परिपत्रकाची महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि ...
सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली ज ...
भरधाव आॅटो अचानक अनियंत्रित होत पलटी झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून ही घटना आर्वी मार्गावरील सुकळी (बाई) शिवारात शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसी कारवाईच्या धाकाने आॅटोचालकाने जखमी प्रवाशांना वाहन सरळ करून त्यात बसवून घटना ...
न्यायालयाच्या सुचनांवरून जिल्हास्तरीय स्कूल परिवहन समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, अनेक शाळांमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेत स्कूल परिवहन समिती आॅनलाईन पद्धतीचा वापर करून स्थापन केल्या नसल्याचे वास्तव असून हा प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक् ...
गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाºया रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यां ...
येथील नगरपंचायतीने स्वच्छतेकरिता जवळपास ५७ लाखांचे कंत्राट दिले असून स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली. परिणामी समुद्रपूर नगरपंचायतीला जिल्ह्यातून स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ...
बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...