पुणे येथील आयुक्त कार्यालयात दिव्यांग बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध नोंदवत दोषींवर आर.पी.डब्लू.डी.अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे. ...
स्थानिक नगर पालिकेचा ५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा व वर्षाअखेर ७ कोटी ८५ लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या. ...
भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. ...
स्थानिक न.प.चा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ‘ना नफा ना तोटा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन १५०.६९ कोटींच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्याला सभागृहाने म ...
सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत ...
विकासाच्या नावाखाली सध्या अवैध वृक्षकत्तलीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळते. याच पाश्वभूमिवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लाकडू भरलेली दोन मालवाहू पकडली. सदर वाहनचालकांकडे लाकडाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत ...
अचानक लागलेल्या आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर फुटले. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी घरातील संपूर्ण साहित्य व घर जळून कोळसा झाले. यात कलावती हेमराज रेवतकर यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून या घटन ...
शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन ...