बुधवारी आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी शरद विठ्ठल निखार यांच्या शेतातील गोठा जळून १० लाख रुपयाचे नुकसान झाले. तर आष्टी तालुक्यातील तळेगाव श्या.पत. येथे शेतकरी शेषराव श्रीराव यांच्या गव्हाच्या गंजीला आग लागल्याने त्यांचे ४० हजार रुप ...
गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई करून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ८९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक करण्यात आली आहे. ...
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारित डॉ. मंजूषा संजय स्वामी लिखित पाठ्यपुस्तक सप्तरंग या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला आहे. पण पुस्तकात महाराजांची जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६२७ अशी चुकीची नोंदविण्यात आली आहे. ती दुरुस्त करण् ...
जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव ...
येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यावर सेलू गावाचा विकास करण्याकरिता शासनाने नविन नगरपंचायत योजनेंतर्गत सव्वा पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी थेट नगरपंचयातला मिळणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाला सुरुवा ...
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या आठ घाटांपैकी सर्वाधिक बोली आष्टी तालुक्यातील धोची या घाटाची लागली असून हा वाळू घाट २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयात आरपीपी इंफ्रा.प्रोजेक्टस लिमिटेडने घेतला आहे. ...
नजिकच्या कात्री या गावातील आठवडी बाजारात मासेविक्रेते बाजार आटोपल्यावर आपल्या व्यवहारातील पैशाचा हिशोब जुळवत बसले होते. यादरम्यान अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी या मासेविके्रेत्यांकडे धाव घेत जुगाराचे पैसे समजून ते हिसकावून घेत मारहाण के ...
शहरातील शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर सुभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. काही काळ या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झ ...
राष्ट्रीय महामार्ग अवार्डनुसार बांधकामाचा मोबदला न देता बळजबरीने जागा खाली करण्याचा प्रयत्न होत आहे. याला विरोध करीत आज सेलडोह येथील नागरिकांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरुन आधी मोबदला द्या, नंतरच ताबा घ्या, असा निवेदनातून इशारा दिला आहे. ...