स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला. ...
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे. ...
जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतातील सिंचनाचे स्रोत उचक्या देत आहेत. तरीही निसर्गाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीची तयारी करीत कपाशी बियाणे डोबणे सुरू केले आहे. ...
आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर आयटकच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तकांनी धरणे आंदोलन केले. ...
शेतकऱ्यांचे राहणीमान व जीवन उंचावेल या दृष्टिकोनातून शासन अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन देवळी-पुलगाव क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केले. ...
बजाज चौकातून शिवाजी चौकाकडे येताना डावा वळणमार्ग भामटीपुराकडे जाणाऱ्या मार्गावर तनुश्री लॉजच्या बाजूला वाहतूक पोलीस विभागाकडून एकेरी मार्गावरून येणाºया वाहनांना मनाई असा फलक लावलेला आहे. मात्र सूचना एकाच बाजूने लिहिलेली असल्याने वाहनचालकांच्या दृष्टी ...
अंगणवाडीचे कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण देश रोशन’ उपक्रमाअंतर्गत आय.सी.डी.एस, सी.ए.एस. या अॅपच्या माध्यमातून अंगणवाडीसेविकांंना नोंदी ठेवण्याकरिता मोबाईल संच पुरविण्यात आले आहेत. ...
तालुक्यातील गोविंदपूर शिवारात भरधाव वाहन रस्तादुभाजकावर चढून उलटले. यात दोघे जण जखमी झाले. हे वाहन चांदा आॅर्डनन्स फॅक्टरीचे असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी सायंकाळी उशीरा ही घटना घडली. ...
जन्मदिनाच्या दिवशी बाहेरून येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय बालकाचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पियुष गुरूदेव रामगडे (१६) रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे. ...
कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली होती. शिवाय काहींनी लॅबही बंद ठेवली ह ...