जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मागील अनेक वर्षांपासून शासकीय दूध योजनेस दूध पुरवठा केला जात आहे. आता या शासकीय दूध योजनेकडून दुधात २९.५ लॅक्टोमीटर, ३.५ फॅट तर ३.० ते २.८९ मिली प्रोटिन असावयास हवे, अशी अट घालून दूध उत्पादक संघाचे दूध परत केले जात आहे. ...
वर्धा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोठा येथील मुख्याध्यापकाने पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना दाखले देऊन शाळाबाह्य केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठि ...
जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्य ...
आरक्षणाला विरोध करीत ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या मागणीसाठी गुरूवारी हिंगणघाट शहरात महामोर्चा काढण्यात आला. यात विविध जाती-धर्माचे महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार् ...
शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आह ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दू ...
चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...