अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...
तरुणी गृहरक्षक दलात कार्यरत असून, तिने पिपरी परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील एका बिल्डिंगमध्ये स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात ती ७० ते ८० टक्के भाजल्याची माहिती असून, तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...
जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण ट्रेस झाला नसला, तरी मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येनेच नवीन कोविडबाधित सापडत आहेत. ५ जानेवारीला १४, ६ जानेवारीला २१, तर ७ जानेवारीला ४२ नवीन कोविडबाधित सापडल्याने प्रशासनासह नागरिकांत दहशत असताना ...
केंद्रीय मंत्री गडकरी हे हिंगणघाट येथे १२ डिसेंबरला आले होते. याच्या एक दिवसापूर्वी प्रवीण महाजन याने आ. कुणावार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विदर्भाच्या मुद्द्यावर मागणी करायची असून, निवेदन देऊन त्यांना शाई फासणार असल्याचे सांगितले होते. ती ...