पी. चिदंबरम यांनी जाणल्या दत्तकग्राम मदनीवासीयांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:31 AM2017-11-26T01:31:16+5:302017-11-26T01:32:17+5:30

दत्तकग्राम योजनेंतर्गत माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या विकासाची धूरा त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी शनिवारी या गावाला भेट देत समस्यांची माहिती घेतली.

P. Chidambaram knew that the problems of Madanwasi Dattakagram | पी. चिदंबरम यांनी जाणल्या दत्तकग्राम मदनीवासीयांच्या समस्या

पी. चिदंबरम यांनी जाणल्या दत्तकग्राम मदनीवासीयांच्या समस्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत दिल्या कामांच्या सूचना

ऑनलाईन लोकमत 
वर्धा : दत्तकग्राम योजनेंतर्गत माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या विकासाची धूरा त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी शनिवारी या गावाला भेट देत समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावकºयांशी संवाद साधत विविध प्रस्ताव स्वीकारले.
मदनी ग्रामपंचायतच्या प्रांगणात गावातील नागरिकांच्या उपस्थितीत गावामध्ये राष्ट्रीयकृत बँक शाखा, क्रीडांगण, वाचनालय, सांस्कृतिक भवन, गावातील पाणी पुरवठा योजना, व्यायाम शाळा, या सगळ्या कामाकरिता लागणाºया जागेची स्वत: पाहणी केली. सोबत अनेक विकास कामांचे प्रस्ताव गावकºयांकडून घेण्यात आले. यावेळी आ. कांबळे यांच्याशी चर्चा करून विकास कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गावाच्या भेटीनंतर विकासाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागातील अधिकाºयांची बैठक घेऊन संबंधित विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्यास सांगितले.
याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. सदस्य उज्वला देशमुख, मदनी सरपंच दीपक कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पांडुरंग देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनोहर खडसे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर ढगे, जि.प.सदस्य संजय शिंदे, सुमित्रा मलघाम, सुकेशिनी धनवीज, मनीष गंगमवार, सुनील बासु, माजी पं.स. सभापती बाळा जगताप, विपीन राऊत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, श्रीकांत बारहाते, प्रमोद पोद्दार, विशाल हजारे, पुरुषोत्तम टोनपे, संगिता मोहर्ले, पं.स. सदस्य संदीप शिंदे, उपसरपंच अशोक अतकरसह गावकरी उपस्थित होते.
सेवाग्राम आश्रमाला भेट
सेवाग्राम : माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी महात्मा गांधी आश्रमला भेट देत बापू कुटीमधील सर्वधर्म प्रार्थनेत सहभाग घेतला. आश्रमात पी. चिदंबरम यांचे अधीक्षक भावेश चव्हाण व व्यवस्थापक नामदेव ढोले यांनी सूतमाळ व सेवाग्राम आश्रम पुस्तक देऊन स्वागत केले. आश्रम व स्मारकांची माहिती घेत सर्वधर्म प्रार्थना झाली. याप्रसंगी आश्रमाच्या कुसूम पांडे, शोभा, प्रभा शहाणे, मिथून हरडे, शंकर वाणी, राज थूल, सुधीर मडावी, जयश्री पाटील इत्यादी उपस्थित होते. आश्रमासमोर ११ आॅक्टोबर पासून सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह सुरू आहे. या कर्मचाºयांनी पी. चिदंबरम यांना निवेदन देत माहिती दिली. यावेळी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीचे सागर कुत्तरमारे, मधुकर टोणपे, हरिदास वानखेडे इत्यादी उपस्थित होते.
आश्रमातील अभिप्राय
सेवाग्राम भेटीच्या संधीला माझे भाग्य समजतो. जिथे महात्मा गांधीजींनी १० वर्षे राहून भारतासाठी कार्य केले. मी भावमुग्ध झालो. ज्या पद्धतीने गांधीजी आपल्या ८० वर्षांपूर्वी वास्तू उभारल्या त्या आजही जशाच्या तशाच आहे. गांधीजींप्रती पवित्र आदरयुक्त भावना मी व्यक्त करतो.

Web Title: P. Chidambaram knew that the problems of Madanwasi Dattakagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.