दोन लाखांवर गावठी, विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:22+5:30

तारफैल येथे छापा घातला असता आरोपी किसना डोळे पसार झाला. यावेळी दोन गावठी मोहा दारूच्या हातभट्ट्या तोडून नाश करण्यात आल्या. उकळता मोहा सडवा रसायन, कच्चा मोहा सडवा, रसायन व गावठी मोहा दारू असा एकूण ९३ हजार ६७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Over two lakhs of marijuana, foreign liquor seized | दोन लाखांवर गावठी, विदेशी दारूसाठा जप्त

दोन लाखांवर गावठी, विदेशी दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची वॉश आऊट मोहीम : दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीदरम्यान दारूचा महापूर वाहू शकतो, ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दारूविक्रेत्यांवर छापे घालणे सुरू केले आहे. पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत २ लाख ७ हजार ८७५ रुपयांचा विदेशी, गावठी दारूसाठा जप्त केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बत्रा ले-आऊट वार्ड क्र. ४ बोरगाव येथे छापा घातला असता मंगेश संजय प्रधान (२४) रा. पुलफैल हा गावठी मोहा दारू गाळताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मोहा सहवा, रसायन, मोहा दारू असा एकूण ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तारफैल येथे छापा घातला असता आरोपी किसना डोळे पसार झाला. यावेळी दोन गावठी मोहा दारूच्या हातभट्ट्या तोडून नाश करण्यात आल्या. उकळता मोहा सडवा रसायन, कच्चा मोहा सडवा, रसायन व गावठी मोहा दारू असा एकूण ९३ हजार ६७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, डीबी पथकाचे विवेक लोणकर, दिवाकर परिमल, पवन नीलेकर, अरविंद घुगे, सचिन दीक्षित तर दुसरी कारवाई गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, नायक पोलिस शिपाई सचिन इंगोले, सचिन धुर्वे व दिनेश राठोड यांनी केली. निवडणूक लक्षात घेता पोलिस प्रशासनाने कारवाईची धडक मोहीम सुरू केल्याने शहरासह ग्रामीण भागातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

पांढरकवडा पारधी बेड्यावर वॉश आऊट
नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर सावंगी पोलिसांनी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान गावठी दारूसह दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पांढरकरवडा पारधी बेड्यावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची इतर ठिकाणी विक्री केली जात असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी बुधवारी सकाळी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ३५ लोखंडी ड्रम मधील कच्चा मोह रसायण सडवा, ३०० लिटर गावठी मोह दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुश जगपात यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत सावंगी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली.

विदेशी दारूसाठा जप्त, आरोपीस अटक
लकी महेंद्र सवाई (३१) वर्ष रा. शिवाजी शाळेजवळ, स्टेशनफैल, वर्धा हा राहत्या घरी अवैधरीत्या विदेशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. पथकाने छापा घालून घरझडतीमध्ये १८० मि. लि. च्या आॅफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद एकूण १४४ बाटल्या व एक प्लास्टिक चुंगडी असा एकूण किंमत ३६ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस कर्मचारी संजय पंचभाई, मंगेश झांबरे, निखिल वासेकर व विजय काळे यांनी केली.

शहरात बनावट दारूची विक्री जोरात
विधानसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्याकरिता दारूचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. याकरिता लगतच्या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आणला जातो, हे लक्षात घेऊन पोलिस विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या सीमांवर तब्बल २० चेकपोस्ट लावले आहेत. पोलिस प्रशासनाची दारू वाहतुकीवर करडी नजर आहे. त्यामुळे दारू वाहतुकीला लगाम लागला आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही दारूविक्रेत्यांकडून बनावट दारूची चढ्या भावात विक्री केली जात आहे. दारूविक्रेत्यांकडून २५० रुपयांना विकली जाणारी दारूची बाटली चक्क ३०० ते ४०० रुपयांना विकली जात आहे. नाईलाज असल्याने मद्यपी खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

बरबडी शिवारातही मोहीम
वर्धा- भूगाव कंपनीच्या मागील भागात नाल्याच्या काठावर वॉश आऊट मोहीम राबवून १७ लोखंडी ड्रममध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे ३ हजार ४०० लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रत्येकी ८० रूपये प्रमाणे २ लाख ७२ हजार, १२ पिप्या मध्ये १५ लिटरप्रमाणे १८० लीटर कच्चा मोहा रसायन सडवा १४ हजार ४००, दोन लोखंडी ड्रममध्ये उकळता मोहा रसायन सडवा ६० लिटर किंमत ४ हजार ८०० , ४ डबकी मध्ये ५६ लीटर गावठी मोहा दारू किंमत ५ हजार ६०० रूपये, ८ प्लास्टिक डपक्या किंमत ८००, असा एकूण ३ लाख ११ हजार ७४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखलक करण्यात आला.

Web Title: Over two lakhs of marijuana, foreign liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.