शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 5, 2015 01:14 IST2015-07-05T01:14:16+5:302015-07-05T01:14:16+5:30
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शनिवारी सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागासह शहरात सर्व्हे करण्यात झाला.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
वर्धा : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शनिवारी सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागासह शहरात सर्व्हे करण्यात झाला. यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ५४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळल्याची माहिती आहे.
वर्धेतील आर्वी नाका गजानन नगर, वडार वस्ती येथून करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती मिलिंद भेंडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र काटोलकर, गटशिक्षणाधिकारी कोडापे, प्रशासन अधिकारी टेभुर्णे, विस्तार अधिकारी येंडे, झोनल अधिकारी जमाने उपस्थित होते. भेंडे यांनी आर्वी नाका, वडर वस्ती येथील पालक, विद्यार्थी बालकांसोबत संवाद साधला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना शाळेत पाठविण्याची विनंती पालकांना केली. काटोलकर यांनी सुद्धा वडर वस्ती, भीमनगर, गजानननगर येथील वस्तीमधील पालकांसोबत चर्चा केली. त्याच प्रमाणे शाळेत दाखल झालेले मुले नियमित पणे शाळेत जात नाही. काय अडचणी आहेत. त्याचे म्हणणे जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. त्याच प्रमाणे येथील मुले ज्या शाळेत दाखल आहेत त्या मुख्याध्यापक व सहाय्यक अध्यापकांनी वस्तीमध्ये नियमितपणे पालक संपर्क करण्याचे निर्देश दिले.(प्रतिनिधी)