७० एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:37 IST2017-11-12T23:36:45+5:302017-11-12T23:37:17+5:30
तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली.

७० एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. या शेतीमुळे विषमुक्त अन्न, पर्यावरणाचे रक्षण व उत्पादन खर्चात वाढ आदी फायदे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहेत.
शेतकरी आपल्या शेताला टप्प्याटप्प्याने सेंद्रीय शेती परावर्तीत करण्याच्या दृष्टीने रासायनिक खताचा अत्यल्प वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीऐवजी दंशपरणी अर्काची फवारणी जीवांमृत, बिजांमृत, गांढूळ खताचा वापर, हिरवळीची खते, कम्पोस्ट खताचा वापर वाढविला. यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे, रासायनिक खताच्या अतिरेकी तसेच वापरामुळे महागड्या कीटकनाशकांचा वापर यामुळे धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. परंतु ज्या शेतकºयांनी सेंद्रीय निविष्टांचा वापर केला, अशा शेतकºयांच्या धानपिकावर अत्यल्प प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले.
सेंद्रीय शेतीकरिता आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तसेच कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास तांबे, तालुका कृषी अधिकारी रजपूत, मंडळ कृषी अधिकारी उभे, आत्माचे तालुका तंत्रज्ञ उंदीरवाडे, अनिल ऐलवार यांनी शेतकºयांना सेंद्रीय निविष्टा तयार करणे, त्याचा वापर करणे यावर वारंवार बैठका घेऊन तसेच शेतींना भेटी देऊन कार्य केले. त्यामुळे सेंद्रीय शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व उत्पादन वाढही होण्याची शक्यता वागदरा येथे दिसून येत आहे.