शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पशुसंवर्धन सहायक आयुक्ताच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:04 PM

हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते.

ठळक मुद्देपशुपालकांच्या वाढत्या तक्रारीनंतर वरिष्ठांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते. यासंदर्भात लोकमतनेही वृत्त प्रकाशित करताच पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे हिंगणघाटच्या पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.हिंगणघाट परिसराचा आवाका लक्षात घेता परिसरातील गोपालकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुविधायुक्त असे तालुका लघू पशु सर्व चिकित्सालय स्थापन करण्यात आले. या चिकित्सालयासोबत आठ गावे जोडलेली आहेत.या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, एक लिपीक व एक परिचर असे पदे मंजूर आहेत. त्यापैकी लिपीक व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे रिक्त आहेत. या ठिकाणी सुविधा असतानाही अधिकारीच मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने जनावरांवर योग्य उपचार होत नाही, अशी ओरड गोपालकांकडून करण्यात आली. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाल्याने याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे गोपालकांडून सांगण्यात आले. त्यामुळे आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून चांगलेच धारेवर धरत जनावरांवर योग्य उपचार करा, शस्त्रक्रिया अशाही सूचना दिल्या होत्या. याचीच दखल घेत पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशी लावली आहे.पशुसंवर्धन आयुक्तांनी मागितला खुलासातालुक्यात तोंड खुरी व पायखुरीची लागण झाली असतानाही जनावरांना योग्य उपचार होत नाही, असा आरोप पशुपालकांकडून करण्यात आला होता.यासदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी हिंगणघाटच्या सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, पशुधन विकास अधिकारी हिंगणघाट व पशुधन विकास अधिकारी समुद्रपूर यांना पत्र देऊन खुलासा मागितल्याचीही माहिती आहे.पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांच्या आदेशानुसा मंगळवारी हिंगणघाटला जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर करावयाचा आहे.- डॉ.राजीव भोजणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा.