शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प टाकरखेडला

By admin | Updated: May 8, 2014 02:12 IST

श्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली

धूपबत्ती, गांडूळ खत निर्मितीविद्युतचीही होते निर्मिती : लहानुजी महाराज संस्थानचा उपक्रमसंजय देशमुख■ टाकरखेडश्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली व स्वयंपाक शिजविण्याचा प्रश्न मिटला. सोबतच विद्युत भारनियमनावर मात करण्यासाठी वीज निर्मितीही करण्यात आली. हा प्रकल्प विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प म्हणून उदयास आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.या संस्थानमध्ये ११ हजार अन्नदाते आणि दररोज ५00 ते ६00 भाविक महाप्रसादाचा घेतात. यामुळे प्रत्येक महिन्यात तीन टन इंधन लागत होते. पर्यायाने ३ टन झाडांची कत्तल होत होती. यासाठी १८ हजार रुपये खर्च करावे लागत होते. संस्थानकडे गोरक्षण असून २५0 जनावरे आहेत. सरासरी ५ किलो आणि दररोज १२00 किलो शेण मिळते. याचा विचार करून गोबरगॅस संकल्पना राबविली जाऊ शकते, ही बाब संस्थानच्या संचालकांना लक्षात आली. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अहमदनगरचे जि.प. उपकार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांच्या मार्गदर्शनात १0५ घनमीटरचा एक प्लॉट न करता भविष्यात उपलब्ध होणारे कमी-अधिक शेण याचा विचार करून ३५ घनमीटरचे तीन प्लांट तयार करण्यात आले. शेण व पाण्याचे मिश्रण करण्यासाठी यंत्राचा उपयोग केला आहे. निर्माण झालेली गॅस शुद्ध करून एका बलूनमध्ये भरली जाते. ही गॅस स्वयंपाकगृहात पाठवून त्यापासून दररोज ६00 लोकांचा स्वयंपाक होतो. यात वर्षाला २ लाख १६ हजार रुपयांची बचत होत असून झाडाची कटाई थांबली.गॅसवर चालणारे जनरेटर बसवून १५ किलो वॅट विद्युत निर्माण करण्यात येते. यावर दररोज पाण्यासाठी लागणारा ५ हार्सपावरचा पंप दोन तास चालविला जातो. भारनियमन काळात संस्थानला लागणारी पूर्ण वीज यातून मिळते. अपारंपारिक स्त्रोत निर्माण करून आर्थिक बचतीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्थानने यशस्वी केले. शिवाय लग्नप्रसंगी वाया जाणारे अन्न व भाज्यांचे अवशेषही यात वापरले जातात. प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तूही तयार केल्या जातात. हा उपक्रम पाहून भारतातील पहिल्या हरितक्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांनी संस्थानला भेट दिली. संस्थानमध्ये त्यांच्या संस्थेची भारतातील पहिली शेतकरी प्रशिक्षण शाळा चालू करण्यात आली. यात शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकासह शेतीबाबत तज्ज्ञांद्वारे विनामूल्य मार्गदर्शन केले आहे.

■ या प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. यात गांडूळ खत, गांडूळ पाणी, धूपबत्ती, मच्छर अगरबत्ती यांचा समावेश आहे. या खताचा उपयोग संस्थानच्या शेतीत करून १00 टक्के रसायनमुक्त करण्याचा मानस आहे.