शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:32 IST

एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपावणेदोन कोटींच्या नळयोजनेनंतरही परिस्थिती गंभीर

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा करणे हे मागील नऊ वर्षांपासून सूरू आहे.तालुक्यात प्रथम नळयोजना घोराड गावात तत्कालीन सरपंच शंकरराव खोपडे यांनी आणली. या नळयोजनेचे काम १९७४ साली पूर्ण झाले. शिवाय तत्कालीन पालकमंत्री प्रभा राव यांच्या उपस्थितीत १९७५ ला या नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी दोन सार्वजनिक विहिरीवरून उचल केलेले पाणी एका जलकुंभात साठविले जात होते. शिवाय याच पाण्याचा पुरवठा गावातील दिवसातून दोन वेळा केल्या जात होता. तब्बल ३५ वर्षानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यास जात असलेली अडचण पाहता नवीन नळयोजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा झेंडी मिळाला. २०१६-१७ या वर्षात पावणे दोन कोटींची नळ योजना कार्यान्वित होवून नवसंजीवनी मिळाली. नव्याने पाईप लाईन, दोन नवीन जलकुंभ आणि एका विहिरीची यात भर पडली.तसेच नळावर मिटर लाऊन २४ तास पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली; पण जुनीच परिस्थिती कायम राहिली. पावणे दोन कोटी खुर्चनही घोरडवासियांना दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण कायम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवणूक कशी करावी हा प्रश्न भेडसावत आहे.४० वर्षे जुन्या जलकुंभाचा आधारसहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन नळयोजना कार्यान्वित झाली. यात दोन नव्याने जलकुंभ बांधण्यात आले. मात्र, नवीन नळयोजना मंजूर करताना ४० वर्ष जुन्या जलकुंभ जिर्ण झाल्याची बाब समोर करण्यात आली होती. जि.प. पाणी पुरवठा विभाग आजही जिर्ण जलकुंभातून पाणी पुरवठा करण्यास मंजूरी देत आहे. याचा अर्थ जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना तीन जलकुंभाची आखणी का केली नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.गावात २४ हातपंपासह पाणी पुरवठ्याच्या सात विहिरीघोराडमध्ये २४ हातपंप, पाणी पुरवठा करू शकणाऱ्या ७ विहिरी आहेत. जवळपास ११५० नळ जोडणी आहे. या सर्व विहिरी नळ योजनेला जोडल्यास ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करणे सहज शक्यत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई