शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

६८ लाखांची इमारत, दरमहा लाख रुपये खर्च अन् विद्यार्थी मात्र एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्डमधील सरकारी दवाखान्याच्या मागे २०१४ मध्ये कमला नेहरु प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली. या इमारतीकरिता तब्बल ६८ लाख ४३ हजार ६९२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देपटसंख्यावाढीकडे दुर्लक्ष : हिंगणघाटच्या कमला नेहरू शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठी शाळांकडे पालकांसह विद्यार्थ्यांचाही कल नसल्याने मराठी शाळा ओसाड पडल्या आहे.संबंधित विभागही कानाडोळा करीत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे वास्तव हिंगणघाट येथील नगरपालिकेच्या कमला नेहरु प्राथमिक शाळेतून पुढे आले. येथे ६८ लाख ४३६ हजार ४२ रुपयातून शाळेची इमारत बांधण्यात आली. दरमहा एक लाख रुपये खर्च हातो आणि पटसंख्या केवळ एक आहे. त्या विद्यार्थ्याचेही शाळेत मन रमत नसल्याने तोही दांडी मारत असल्याचेच चित्र आहे.हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्डमधील सरकारी दवाखान्याच्या मागे २०१४ मध्ये कमला नेहरु प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली. या इमारतीकरिता तब्बल ६८ लाख ४३ हजार ६९२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे. या शाळेत पहिली ते चवथी पर्यत वर्ग आहे पण; मराठी शाळांबद्दल असलेली उदासिनता आणि पटसंख्या वाढीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या शाळेत चारही वर्गांपैकी फक्त इयत्ता तिसरीमध्ये एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे.त्याकरिता एक शिक्षक व शिपायी असे दोन कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनापोटी दरमहिन्याला जवळपास एक लाख रुपयांचा खर्च होत आहे. विशेषत: शाळेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थीही अमावश्या-पोर्णिमेलाचा शाळेत येत असल्याने कार्यरत शिक्षकांसह कर्मचाऱ्यांलाही हातावर हात ठेऊन बसण्याचेच वेतन मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकाराबद्दल ना शाळेतील शिक्षकांनी कधी तक्रार केली ना पालिका प्रशासनाने लक्ष दिले, परिणामी शासनाचा मोठा निधी विनाकारण खर्ची जात असून विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव आता पुढे आले आहे.यासंदर्भात तक्रारीही होऊ लागल्याने आता पालिका प्रशासन आता काय उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.शिक्षकाचे समायोजन व विद्यार्थ्याला सोईच्या शाळेत प्रवेश द्याहिंगणघाट येथील कमला नेहरु प्राथमिक शाळेतील पटसंख्येबाबत तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांनी शाळेला भेट देऊन वास्तविकता जाणून घेतली. तेव्हा त्यांना वर्ग १ ते ४ थी पर्यंतच्या वर्गात केवळ अमोल सुभाष पवार हा एकमेव विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले. या एका विद्यार्थ्यांकरिता लाख रुपयाचा खर्च होत असल्याने येथील शिक्षकाचे दुसºया शाळेत समायोजन करावे तसेच विद्यार्थ्याला दुसºया शाळेत प्रवेश देऊन याचा अहवाल हिंगणघाट पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिल्यात. सोबतच पोषण आहाराअंतर्गत २४.५०० किलो तांदूळ शिल्लक असल्याने यानंतर तांदूळ स्वीकारू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा