लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : अॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. देवळी-पुलगाव मार्गावरील तिवारी ले-आउट परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.प्रज्वल शंकर चांदेकर (१९) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मिलिंद सुखदेव गेडाम (१८) रा. चिकणी, मंगल मेश्राम (५५) नरेंद्र मडावी (२०) रा. चिकणी हे जखमी झालेत.अॅपेचालक देवळीवरून चार प्रवासी घेऊन चिकणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार दोघे देवळीकडे जात होते. देवळीवरून १ कि़मी. अंतरावर तिवारी ले-आऊट देवळी-पुलगाव मार्गावर प्रवासी अॅपेने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रज्वल शंकर चांदेकर हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला मिलिंद सुखदेव गेडाम (१८) चिकणी हा गंभीर जखमी झाला. अॅपेतील प्रवासी मंगल मेश्राम (५५) हे गंभीर तर चालक नरेंद्र मडावी (२०) किरकोळ जखमी झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहे.
अॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST
अॅपेचालक देवळीवरून चार प्रवासी घेऊन चिकणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार दोघे देवळीकडे जात होते. देवळीवरून १ कि़मी. अंतरावर तिवारी ले-आऊट देवळी-पुलगाव मार्गावर प्रवासी अॅपेने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रज्वल शंकर चांदेकर हा जागीच ठार झाला.
अॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार
ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी । देवळी- पुलगाव मार्गावरील घटना