अ‍ॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:27+5:30

अ‍ॅपेचालक देवळीवरून चार प्रवासी घेऊन चिकणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार दोघे देवळीकडे जात होते. देवळीवरून १ कि़मी. अंतरावर तिवारी ले-आऊट देवळी-पुलगाव मार्गावर प्रवासी अ‍ॅपेने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रज्वल शंकर चांदेकर हा जागीच ठार झाला.

One killed in a Ape-bike accident on the spot | अ‍ॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार

अ‍ॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी । देवळी- पुलगाव मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : अ‍ॅपे-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. देवळी-पुलगाव मार्गावरील तिवारी ले-आउट परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.
प्रज्वल शंकर चांदेकर (१९) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मिलिंद सुखदेव गेडाम (१८) रा. चिकणी, मंगल मेश्राम (५५) नरेंद्र मडावी (२०) रा. चिकणी हे जखमी झालेत.
अ‍ॅपेचालक देवळीवरून चार प्रवासी घेऊन चिकणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार दोघे देवळीकडे जात होते. देवळीवरून १ कि़मी. अंतरावर तिवारी ले-आऊट देवळी-पुलगाव मार्गावर प्रवासी अ‍ॅपेने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रज्वल शंकर चांदेकर हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला मिलिंद सुखदेव गेडाम (१८) चिकणी हा गंभीर जखमी झाला. अ‍ॅपेतील प्रवासी मंगल मेश्राम (५५) हे गंभीर तर चालक नरेंद्र मडावी (२०) किरकोळ जखमी झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहे.

Web Title: One killed in a Ape-bike accident on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात