कार-दुचाकीच्या अपघातात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:07 IST2017-10-15T23:06:39+5:302017-10-15T23:07:01+5:30
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जखमी झाला.

कार-दुचाकीच्या अपघातात एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर घडली.
सविस्तर वृत्त असे की, एम. एच. ३२ वाय. ०१९७ क्रमांकाच्या कारने एम. एच. ३२ ए. डी. १४६३ क्रमांकाच्या दुचाकीला धडक देत थेट दुचाकीसह चालकास सुमारे २० फुटापर्यंत फरफटत नेले. यात दुचाकी चालकाच्या हाताला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. तसेच उड्डाण पुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्तलिहिस्तोवर जखमीचे नाव कळू शकले नाही.