एसटीच्या वर्धा विभागाला दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:07+5:30

कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.

One-half crore hit Wardha section of ST | एसटीच्या वर्धा विभागाला दीड कोटींचा फटका

एसटीच्या वर्धा विभागाला दीड कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : सात दिवसांपासून फिरलीच नाहीत चाके

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला तब्बल दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.
वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. संपूर्ण विभागात एकूण २६७ बसगाड्या आहेत. लग्नसराईचा काळ महामंडळाकरिता सुगीचा असतो. मात्र, यावेळी कोरोनाने सर्वत्र कहर केल्याने लग्नसोहळे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांनाही जबर फटका बसला आहे.
शासनाच्या आदेशावरून गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केली आहे. जिल्ह्याच्या सीमाही सिल करण्यात आल्या असून खासगी आणि सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धा विभागांतर्गत पाचही आगारातून औरंगाबाद, नाशिक, पुणे, शिर्डी, नांदेड आदी लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात दररोज शेकडोवर बसफेºया सोडल्या जातात. वर्धा विभागाचे दररोजचे सरासरी उत्पन्न २० लाख रुपये इतके आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत बसफेºया मागील सात दिवसांपासून १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
या सात दिवसांच्या काळात महामंडळाच्या केवळ वर्धा विभागाला वाहतूक उत्पन्नापोटी दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती तशीही फारशी चांगली नसून पूर्वीच तोट्यात आहे. कोरोना संकटाने महामंडळाच्या तोट्यात मात्र, आणखी भर घातली आहे.

वर्धा विभागात २६७ बसगाड्या
वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. चारही आगार मिळून एकूण २६७ बसगाड्या आहेत. यात लांब पल्ल्यावर धावणाºया चार अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे या सर्व बसगाड्या सद्यस्थितीत त्या त्या-त्या आगारात उभ्या आहेत.

कोरोनाचा विषाणूला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मागील सात दिवसांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिलपर्यंत महामंडळही लॉकडाऊन असणार आहे. हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता असून विभागांतर्गतच्या आगारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
चेतन हसबनीस
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा

Web Title: One-half crore hit Wardha section of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.