‘एक कुटुंब, एक गाय’चा संकल्प
By Admin | Updated: August 22, 2014 00:04 IST2014-08-22T00:04:03+5:302014-08-22T00:04:03+5:30
ग्रामीण भागातील कुटुंबात गायीच्या दुधाची उणीव लक्षात घेता गरजू कुटुंबाला गोदान करण्याचा संकल्प सर्वोदय गोशाळा ट्रस्टद्वारे करण्यात आला आहे़ त्यानुसार आतापर्यंत ११ गायींचे दान करण्यात आले आहे़

‘एक कुटुंब, एक गाय’चा संकल्प
वर्धा : ग्रामीण भागातील कुटुंबात गायीच्या दुधाची उणीव लक्षात घेता गरजू कुटुंबाला गोदान करण्याचा संकल्प सर्वोदय गोशाळा ट्रस्टद्वारे करण्यात आला आहे़ त्यानुसार आतापर्यंत ११ गायींचे दान करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील गरजू शेतकरी व मजुरांनाच या गायींचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील लोक शेतातून चारा आणून गाईची जोपासना करतात. अशाच गरजू व गायीची सेवा करणाऱ्या लोकांना गायी संस्थेद्वारे दान दिल्या जाणार आहेत़ कोणत्याही धार्मिक परंपरेला बळी न पडता सत्पात्री दिलेले दान हे योग्यच असते़ उलट धार्मिक भावनेच्या आहारी जाऊन दिलेले दान हे त्या गायीवरील अत्याचार आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये सर्वाेदय गोशाळा चरीटेबल ट्रस्टला ३ गायी सुपूर्द करण्यात आल्या़ देवळी पालिकेच्या ताब्यात असलेल्या गायी हस्तांतरीत करताना सचिव मनोज पंचभाई, उपाध्यक्ष जनार्दन तिमांडे, अनिल चाळके, सुरेश मुडे, प्रशांत कारोटकर, राजेंद्र गांजूडे व बजरंग दल पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)