कुंटणखान्यावर धाड महिलेसह एकास अटक
By Admin | Updated: August 14, 2014 00:01 IST2014-08-14T00:01:52+5:302014-08-14T00:01:52+5:30
स्वत:च्या घरात देहविक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या महिलेस सेवाग्राम पोलिसांनी अटक केली़ यात एका इसमासही ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास

कुंटणखान्यावर धाड महिलेसह एकास अटक
वर्धा : स्वत:च्या घरात देहविक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या महिलेस सेवाग्राम पोलिसांनी अटक केली़ यात एका इसमासही ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास म्हसाळा येथे करण्यात आली़
वैशालीनगर म्हसाळा येथे आपल्या राहत्या घरी एक महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता हा प्रकार खरा असल्याचे निदर्शनास आले़ यात सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले़ शिवाय चिंतामण नानाजी निखारे (३८) रा़ जांब यास ताब्यात घेण्यात आले आहे़ उदरनिर्वाह करण्याकरिता देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची कबुली सदर महिलेने पोलिसांना दिली़ या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या ३४७ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला़ बुधवारी सदर महिलेस न्यायालयात हजर करण्यात आले़ ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक साबळे, देवरकर, किटे, हरिदास कडू, पोलीस उपनिरीक्षक वैशाली तोटेवार, दिघोरे, सुनीता ठाकरे, टिपले आदींनी पार पाडली़
या कारवाईने पुन्हा एकदा वर्धेतही कुंटणखाने चालविले जातात, हे सिद्ध झाले आहे़ यापूर्वी पोलीस विभागातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या घराचा कुंटणखान्याप्रमाणेच वापर चालविला होता़ शहरात देहविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते़ शहरातील अनेक भागांत पे्रमी युगूलांना खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सर्वश्रूत आहे; पण पुरावे व तक्रारी मिळत नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नाही़ यामुळे यात वाढच होत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)