शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:32 IST

एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देओमायक्राॅनचे संकट कायम प्रशासनाच्या आदेशाकडे नागरिकांचे लागले लक्ष

वर्धा : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने यंदा तब्बल दोन वर्षांनंतर थर्टी फर्स्टचा माहोल पाहायला मिळणार आहे. तरुणाईकडून आतापासूनच याचे नियोजन करणे सुरू झाले आहे. मात्र, ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे नागरिकांनी थर्टीफर्स्ट घरातच साजरे केले. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने तरुणाईने आतापासूनच थर्टीफर्स्टचे नियोजन करणे सुरु केले आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक केले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसते.

तर दिवसभरात १२,००,००० रुपयांची उलाढाल

शहरासह लगतच्या परिसरात सुमारे ३५० वर हॉटेल्स, रेस्टाॅरंट आहेत. दिवसभरात या हॉटेल्समध्ये अनेक नागरिक जेवण करण्यासाठी जातात. दिवसभरात सुमारे १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र, ओमायक्राॅनमुळे कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा होईल की उत्साहावर पाणी फेरले जाईल, या विवंचनेत हॉटेल चालक व मालक असल्याचे दिसून येत आहे.

पुढील आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता

प्रशासनाने शिथिल केलेले निर्बंध काही प्रमाणात कडक केले आहेत. जिल्ह्यात ओमायक्राॅनचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी पुढील धोका लक्षात घेता यंदा थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात प्रशासनाकडून नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

हॉटेल चालक म्हणतात...

दोन वर्षांपासून कोरोनामुळे थर्टीफर्स्ट साजरा करण्यावर निर्बंध होते. हॉटेलमध्ये अत्यंत तुरळक गर्दी होती. यंदाचा थर्टीफर्स्ट उत्साहात साजरा न झाल्यास हॉटेल मालकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी.

- आकाश राजूरकर, हॉटेल चालक

कोरोना संकटामुळे हातचे काम गेले. मी नव्यानेच हॉटेल टाकले. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. थर्टीफर्स्टसाठी नियोजनही केलेले आहे. आता प्रशासनाने पुन्हा निर्बंध लादल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाने हॉटेल चालकांचा विचार करावा.

- आशुतोष धोटे, हॉटेल चालक.

आरोग्य महत्त्वाचे, स्वागत नंतरही करता येईल

कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घरात राहूनच थर्टीफर्स्टचे स्वागत करावे. आधी आरोग्य महत्त्वाचे आहे. स्वागत पुढील वर्षातही करता येईल.

- प्रणय राऊत.

मागील दोन वर्षांपासून आम्ही कुठलेही सण, उत्सव साजरे केलेले नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करण्यास मुभा द्यावी, अन्यथा केलेल्या नियोजनावर पाणी फिरेल.

- विजय पारखी.

टॅग्स :SocialसामाजिकHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस