शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या तहसील कार्यालय परिसराला झुडुपांचा विळखा

By admin | Updated: June 18, 2016 01:28 IST

येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर : नागरिकांच्या जीवितास धोकासेलू : येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. झुडपांनी त्या भागातील काही रहिवाशांच्या घराला विळखा घातला आहे. मैदानातील वाढलेल्या झुडपातील सरपटणारे प्राणी ं आसपासच्या घरात शिरतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जुन्या तहसील कार्यालयाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. सध्या हे कार्यालय विकास चौकात भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. मात्र जुन्या तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालय व लागुनच भूमिअभिलेख कार्यालय आहे. तसेच अर्र्जेनविसांचे कामकाज येथूनच चालते. त्यामुळे नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. मैदानातील झुडपांना लागूनच तहसीलदारांचे निवासस्थान आहे. त्यांनाही सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील शिरिष देवतळे यांच्या घरी मोठा साप शिरताना नजरेत पडल्याने अनर्थ टळला. मैदानातील व रस्त्यालगतच्या झुडपामुळे रहिवाशांची घरे झाकुन गेली आहे. या झुडपांच्या साफसफाईची जबाबदारी तहसील कार्यालय, नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणीतरी स्वीकारावी, तसेच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी याकडे लक्ष्य देत तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)