टिप्परखाली आल्याने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:26+5:30

किसना नारायण गाडगे (७०) रा. चिंचोली (शिंगरु) असे मृताचे नाव आहे. ते गावातील दिनेश किशोर गायकवाड (२३) याच्यासोबतच एम. एच.३२, एम.५२२९ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटच्या स्टेट बँकेत होते. शहरातील रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर तुकडोजी पुतळ्यापासुनच्या मुख्य रस्त्याचे सिमेटिकरण व पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु असल्याने ऐकरी वाहतूक आहे.

An old man died after falling under a tipper | टिप्परखाली आल्याने वृद्धाचा मृत्यू

टिप्परखाली आल्याने वृद्धाचा मृत्यू

ठळक मुद्देनागरिकांमध्ये रोष : कामाच्या संथगतीने घेतला वृद्धाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील स्टेट बँकेमध्ये निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी दुचाकीवर बसून जात असताना दुचाकी घसरुन पडली. त्यामुळे टिप्परच्या मागच्या चाकाखाली येऊन वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजतादरम्यान शहरातील मुख्य मार्गावर घडली. रस्त्याच्या संथगतीने सुरु असलेल्या बांधकामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
किसना नारायण गाडगे (७०) रा. चिंचोली (शिंगरु) असे मृताचे नाव आहे. ते गावातील दिनेश किशोर गायकवाड (२३) याच्यासोबतच एम. एच.३२, एम.५२२९ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटच्या स्टेट बँकेत होते. शहरातील रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर तुकडोजी पुतळ्यापासुनच्या मुख्य रस्त्याचे सिमेटिकरण व पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु असल्याने ऐकरी वाहतूक आहे.
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे संथगतीने काम सुरु असल्यामुळे नेहमीच अपघात होत आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे. या एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्याने सकाळी एम.एच. १६ सी.ए.०३३२ क्रमांकाचा टिप्परही याच मार्गाने आला. त्यामुळे दिनेशची दुचाकी घसरुन पडल्याने दोघेही विरुद्ध दिशेने फेकल्या गेले. यात किसना गाडगे हे टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून घनश्याम लांडगे व विशाल ढेकले पुढील तपास करीत आहे.
तुकडोजी पुतळा चौक ते सुभाष चौकापर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या सिमेंटिकरणाचे काम नियोजनशुन्य व ढिसाळपणे सुरु असल्यामुळेच किसना गाडगे या वृद्धाचा बळी गेला आहे. या रस्त्यावर दररोज अपघात होत असून आणखीही किती व्यक्तीना जीव गमवावे लागणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.

Web Title: An old man died after falling under a tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात