शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पिकाला पोषक पाऊस, मात्र जलाशये तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही.

ठळक मुद्देसमुद्रपूर तालुक्यातील प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा,पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, समुद्रपूर तालुक्यात या म्हणीच्या उलट झाले आहे. पावसाळा सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तालुक्यात पाऊसच खोटा झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही. सध्या जुलै सुरू आहे. अजूनपर्यंत तालुक्यातील प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगाम सध्यातरी बरा आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली तर रब्बी हंगामात चांगलीच दमछाक होणार आहे. तालुक्यातील सर्वच मध्यम प्रकल्पाची परिस्थिती सध्यातरी एवढी चांगली नाही. तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त फरक नाही. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा लालनाला, पोथरा प्रकल्पाची पातळी अद्याप २५ टक्‍क्‍यांच्या खालीच आहे.   त्यामुळे उन्हाळ्यात समुद्रपूर तालुक्यात व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, एवढा पाऊस होऊन गरजेचे आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली. दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्प हाऊसफुल्ल झाले आहेत.मात्र, तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीच पाऊस बरसत असल्याने या तालुक्याला वरुणदेवाने या यादीतून वगळले काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ऑगस्टमध्ये दमदार पाऊस आला तर शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, सध्या पावसाला जोर नसल्याने विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. तर प्रकल्पाचे दिवास्वप्न पाहणे चुकीचे ठरेल. खरिपाच्या पिकांची स्थिती आतापर्यंतच्या पावसाने चांगली झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी, शेतमजूर आतापर्यंत झालेल्या पावसाने समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अजूनही आठवडाभरात दमदार पाऊस पडला नाही तर पुढील काळात नागरिकांसह प्रशासनाच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण