लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अज्ञाताने भ्रमणध्वनीवरून फोन करून एटीएमचा क्रमांक मिळवून २४ हजार रुपये लंपास केले. ही घटना शहरातील शिक्षक वसाहतीतील मीना दीपक चाफले यांच्याशी मंगळवारी घडली. चाफले नित्याप्रमाणे घरकामे करण्यात व्यस्त होत्या. दरम्यान, तोतया बँक कर्मचाऱ्याचा सकाळी १०.३० च्या सुमारास भ्रमणध्वनी आला. तुमच्या खात्यात गडबड असून ती दुरूस्त करण्यासाठी तुमचा एटीएम नंबर सांगा वा तुमचे बँक खाते सील करण्यात येईल, असे सांगितले. यावरून एटीएम नंबर मिळविला. या प्रकारची शहानिशा करण्यासाठी चाफले या कामे आटोपून बँकेत गेल्या असता त्यांच्या खात्यातून प्रथम १९ हजार ९९९ रुपये व नंतर ४ हजार रुपये काढल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएमचा क्रमांक मिळवून २४ हजार लंपास
By admin | Updated: June 23, 2017 01:37 IST