आता वर्ध्यातही ‘स्क्रब टायफस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:16 IST2018-08-30T00:15:40+5:302018-08-30T00:16:54+5:30
बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आता वर्ध्यातही ‘स्क्रब टायफस’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.परंतू या आजाराला घाबरुन न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांंकडून सांगण्यात येत आहे.
स्क्रब टायफसचे शहरातील विविध भागामध्ये आतापर्यंत पाच च्यावर रुग्ण आढळून आले. त्यातील काहींवर उपचार करुन ते दुरुस्त झाले तर काहींवर उपचार सुरु आहे. हा किटकजन्य आजार असल्याने तो किड्यांच्या चावण्यामुळे होतो. यात जनावरांवरील गोचीड, पावसाळ्यात शेतात दिसणारा लाल रगाचा गोसाई किडा या कीटकांच्या चाव्यामुळे हा आजार कोणालाही होऊ शकतो.किडे आपल्याकडील असले तरी हा आजार आॅफ्रिकन देशातील आहे. हे किडे शरीरातील लपलेल्या भागांवर चावा घेतात. त्यानंतर शरिरामध्ये त्याचे जंतू प्रसारीत होऊन हा आजार बळावतो. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जिवावरही बीतू शकते.
आजाराची लक्षणे
या आजाराचीही डेग्यू सारखीच लक्षणे आहे. यात ताप येणे, पोट दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे तसेच सुस्तपणा जाणवतो. जास्तच उशिर केला तर शरीरावर गाठी येऊन रुग्ण कोमातही जाऊ शकतो.
आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किड्यांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी लांब कपडे घालावे. विशेषत: हे किडे लॉन व बगीच्यात जास्त राहत असल्याने काळजी घ्यावी.वेळीच उपचार हाच त्यावर उपाय आहे.
डॉ.सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा