शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता आई कुणा म्हणू मी! तीन चिमुकल्यांना पडला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 21:38 IST

Wardha News दोन जुळी व अडीच वर्षाच्या मुलीला पोरके करून त्यांच्या मातेने जगाचा निरोप घेतल्याची मनाला हळहळ लावणारी घटना वर्धा येथे घडली.

ठळक मुद्देजुळ्यांना जन्म देऊन माउली गतप्राण

वर्धा : आईची माया विकत घेता येत नाही आणि ती कोणी देऊही शकत नाही, असाच प्रसंग सध्या आंजी येथील तीन चिमुकल्यांवर ओढवला आहे. अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी मुलगा आणि मुलगी, अशा जुळ्यांना जन्म दिल्यानंतर माउलीची अचानक प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून ‘आता आई कुणा म्हणू मी! आई घरी ना दारी...’ अशी म्हणण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.

आंजी येथील रहिवासी प्रशांत जोशी यांचा तीन वर्षांपूर्वी यवतमाळ येथील हर्षा नामक मुलीशी विवाह झाला. प्रशांत, हर्षा आणि प्रशांत यांची वृद्ध दिव्यांग आई, असा तिघांचाच परिवार आहे. त्यांच्याकडे थोडी शेती असून ते पुजारी आहेत. अडीच वर्षांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्यांच्या परिवारात एक चैतन्य निर्माण झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना दरम्यानच्या काळात हर्षाला प्रकृतीचा त्रास जाणवायला लागला. अशातच तिला गर्भधारणा झाल्याने यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु जुळे मुले असल्याने डॉक्टरांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हर्षाला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सर्व उपचार केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी तिने मुलगा- मुलगी, अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला; पण प्रकृती खालावल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. बाळांची प्रकृती ठणठणीत असून, तिच्याही प्रकृतीत सुधारणा होत होती. बुधवारी अचानक प्रकृती खालावली आणि रात्रीच्या सुमारास तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेने जोशी परिवाराला मोठा धक्का बसला असून, आता दोन चिमुकल्या जुळ्यांसह अडीच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. दोन चिमुकल्यांना आईचा नीट चेहराही लक्षात नसताना नियतीने हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

‘त्या’ चिमुकल्यांचे काय?

हर्षा यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयातून बाळांनाही सुटी देण्यात आली असून, सध्या ते परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. गुरुवारी दुपारी साश्रुनयनांनी हर्षाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता. तो म्हणजे ‘त्या’ चिमुकल्यांचे काय? हा प्रश्न परिवारासह नातेवाइकांनाही पडला आहे. परिवारातील सदस्य आणि नातेवाईक या चिमुकल्यांचा सांभाळ करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू