शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेचे फोटो आता अ‍ॅपवरही घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:02 PM

रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अ‍ॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्देमंत्री घेणार तक्रारीची दखल २४ तास सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अ‍ॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलसह देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागात स्थानिक रेल्वे स्थानक परिसरातील व शौचालयातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी व्हॉटस् अ‍ॅप क्रमांक ७४१००८९००४ या क्रमांकावर स्वीकारण्यात येणार आहे. रेल्वेच्या कोणत्याही प्रवाशाला स्टेशन परिसर व शौचालयात अस्वच्छता दिसल्यास त्यांनी त्वरित फोटो काढून या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. २४ तास हा व्हॉटस् क्रमांक प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देणार आहे. या क्रमांकावर तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेवून सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच या संबंधित कारवाईनंतरची छायाचित्र ही प्रवाशाला पाठविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे देशभरातील रेल्वे स्थानक, शौचालय स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असा दावा मंत्रालयाने केला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत रेल प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसर व शौचालय अस्वच्छ असल्यास तक्रारीसाठी फोटो काढून अ‍ॅपवर तो टाकण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात ज्या प्रवाशांकडून तक्रार आली त्याला स्वच्छ झालेल्या परिसराचे फोटोही पाठविले जाणार आहे. यातून स्थानक स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.- सोमेश कुमारमध्य रेल्वे प्रबंधक, नागपूर मंडल

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे