माहिती अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक बनला सूचना फलक
By Admin | Updated: July 10, 2014 23:45 IST2014-07-10T23:45:08+5:302014-07-10T23:45:08+5:30
कोणत्या विभागाचा माहिती अधिकारी कोण याची माहिती देण्याकरिता कार्यालयात माहिती अधिकाऱ्यांच्या नावावा फलक लावण्यात येतो; मात्र सेलू पंचायत समिती कार्यालयातील या फलकावर विविध

माहिती अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक बनला सूचना फलक
घोराड : कोणत्या विभागाचा माहिती अधिकारी कोण याची माहिती देण्याकरिता कार्यालयात माहिती अधिकाऱ्यांच्या नावावा फलक लावण्यात येतो; मात्र सेलू पंचायत समिती कार्यालयातील या फलकावर विविध सूचना चिकटविल्या जात असल्याने नावाचा फलक सुचना फलक बनल्याची चर्चा आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार प्रत्येक विभागात माहिती व अपिलीय अधिकारी यांच्या नावाचा फलक लावला आहे. सेलू पंचायत समितींतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागाचे माहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी कोण त्यांच्या नावाचा मोठा फलक भिंतीवरच तयार करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही ग्रामस्थाला माहिती अधिकाऱ्यांचे नाव पाहता येत होते.
अलिकडे मात्र याच फलकावर पंचायत समिती मार्फत निघालेल्या सूचना व आदेशाच्या कागदी प्रती या फलकावरच चिकटविण्यात येत आहे. याच कार्यालयात असणाऱ्या सूचना फलकावर लावण्यात येत नाही. माहिती अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यांच्या असलेल्या फलकावरच सूचना का लावल्या जातात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. या फलकावर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी, गटविकास अधिकारी कार्यालय पशुवैद्यकीय कार्यालयाचे दुरध्वनी कं्रमाक लिहीले आहेत. जर या फलकालाच सुचना फलक बनवायचा होता तर येथे असलेला सूचना फलक कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. या फलकाची पुन्हा नव्याने रंगरंगोटी करून तो फलक दुरुस्त करावा अशी मागणी या कार्यालयात विविध कामाकरिता येत असलेल्यांकडून होत आहे.(वार्ताहर)