शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'अमित शहांविरुद्ध गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:00 IST

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वात पोलीस कचेरीवर मोर्चा

वर्धा : काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी ख-या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसे पांढरा केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने गुरूवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.

नोटाबंदीच्या कालावधीत सर्वाधिक जुन्या नोटा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बँकेत जमा करण्यात आल्या आहे. नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका व त्रास सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागला. परंतु, याच कालावधीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले अमित शाह यांनी आपल्या बँकेत जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून घेतल्या. हा प्रकार कष्टकरी व सर्वसामान्यांच्या जखमांवर मिठ चोळणाराच आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

मगन संग्रहालय भागातील सदभावना भवन येथून निघालेला मोर्चा दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला.  या आंदोनादरम्यान सदर मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांना सादर करण्यात आले. मोर्चात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, महेश तेलरांधे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी नगरसेवक डब्बु शर्मा, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष प्रतिक भोगे यांच्यासह महिला काँग्रेस, एनएसयुआय तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नोटबंदीच्या निर्णयाचा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बँकेला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. त्याबाबतचे पुरावेही पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.- चारुलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, महिला काँग्रेस.

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसNote BanनोटाबंदीPoliticsराजकारणBJPभाजपा