शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

संगणक परिचालक नव्हे, तर वेठबिगारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:20 AM

राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देखदखद : मानधन रखडल्याने ६३ परिचालकांची उपजीविका ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही. त्यांना मानधन देण्याची जबाबदारी ना तर सरकार स्विकारत आहे, ना संबंधित कंपनी; परिणामी, या परिचालकांची सेवा ही सरकार व कंपनीसाठी केवळ वेठबिगार ठरत असल्याची खदखद संतप्त परिचालकानी लोकमतजवळ व्यक्त ेकेली आहे.राज्य सरकारने देवळी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन संगणक परिचालकांची नियुक्ती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे असभ्य वर्तन आणि अनियमीत मिळणारे मानधन, यामुळे काही संगणक परिचालकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. देवळी तालुक्यातील ६३ परिचालक कार्यरत असून, काहींवर दोन केंद्रांचा कार्यभार सोपविला आहे. वर्षभरापासून मानधनाचा एक पैसाही मिळाला नाही. त्यामुळे कुटूंबाची उपजीविका कशी करायची, असा प्रश्न अनेक संगणक परिचालकांना पडला आहे.राज्य शासनाने मनरेगातंर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा दर २०३ रुपये प्रती दिवस ठरविला. मात्र सुशिक्षित संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीही केले नाही. मानधन मिळत नसल्याने काहींनी कामे सोडली तर काहींनी गावतच मजुरीची कामे करायला सुरुवात केली. राज्य शासनाने ही केंद्र चालविण्याचा कंत्राट 'सीएसी' (कन्व्हरन्स सर्व्हिसेस इंडिया लिमेटेड ) नामक कंपनीला दिला आहे. पूर्वी हा कंत्राट दुसऱ्या कंपनीकडे होते. कंत्राटदार कंपनी बदलली तरी संगणक परिचालकांच्या समस्या सुटल्या नाही. काही परिचालकांना पदरमोड करुन इंटरनेटची बिले भरावी लागत आहे. काहींना ग्राम पंचायतीचे कामे'सायबर कॅफे' मधून करवून आणावी लागतात. त्यासाठीचा खर्च स्वत: करावा लागतो. हा प्रकार अधिकारी, पदधिकारी व लोकप्रतिनींधीना माहिती असूनही ते केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे.शासकीय निधीवर डल्लाप्रत्येक ग्रामपंचायतला लोकसंख्येच्या आधारावर सरकारकडून १४ वा वित्त आयोगातून निधी दिला जातो. त्या निधीतून ग्रामपंचायतला पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या विजेचे बिले भरण्यापासून गावातील विकासकामेही करावी लागतात. ग्रामपंचायतच्या वाट्याला येणाऱ्या निधीतील काही रक्कम आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याच्या नावावर सरकार कंत्राटदार 'सीएसी' कंपनीला देते. संगणक परिचालकांचे मानधन दरमाह १२ हजार रुपये ठरविण्यात आले असून, त्यातील अर्धी रक्कम ग्रामपंचायत व अर्धी रक्कम कंपनीला द्यावी लागते. कंपनी त्यांच्या वाट्याची रक्कम संगणक परिचालकांना देत नाही. शिवाय आजपर्यंत १२ हजाराचे मानधनही मिळाले नाही.