शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

‘नो’ हेल्मेट दुचाकीला ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:28 PM

दुचाकी चालविताना किंवा दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्तच आहे. हेल्मेटमुळे रस्ता अपघातात अनेकांचे प्राण वाचल्याची बरीच उदाहरणे आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : महाविद्यालयांना देणार पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुचाकी चालविताना किंवा दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्तच आहे. हेल्मेटमुळे रस्ता अपघातात अनेकांचे प्राण वाचल्याची बरीच उदाहरणे आहेत. ‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर’ हा उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने राबविल्यानंतर २३ एप्रिलपासून जिल्ह्यात हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला. याच पाश्वभुमिवर आता ‘नो’ हेल्मेट दुचाकीला महाविद्यालयात ‘एन्ट्री’च नाही, अशा आशयाचा आदेश वजा सूचना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सदर सुचनांचे पत्र जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वितरित करण्यात येणार आहे. सध्या बाजारपेठेत ठिकठिकाणी हेल्मेटची विक्री होत आहे. मात्र, नागरिकांनीही शास्वत सुरक्षेच्या दृष्टीने आय. एस. आय. मान्यताप्राप्त हेल्मेटचीच खरेदी करून त्याचा नियमित वापर करावा. हेल्मेटच्या वापरा संदर्भात प्रभावी जनजागृती केल्यानंतर पूर्वी सुचना पत्र व त्यानंतर दंडात्मक कारवाई करणे वाहतूक पोलिसांनी सुरू केले. आतापर्यंत वर्धा शहरात कुठल्याही वाहनचालकावर हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, सदर मार्गदर्शनात्मक पत्रामुळे आता प्रत्येक दुचाकी चालकाला शहरातही हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे. अन्यथा त्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सदर प्रकरणी महाविद्यालयांमधील प्राचार्यांनी व संस्थाचालकांनी सुचनांना केंद्रस्थानी ठेवून योग्य पावले उचलण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्याने अनेक अनुचित प्रकार टाळता येऊ शकतात असा विश्वास वाहतूक पोलिसांना आहे.विद्यार्थ्यांना पटवून देणार महत्त्वहेल्मेटचा वापर कशासाठी हे तरुणांना पटवून देण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आता महाविद्यालय गाठून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर अधिकारी व कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे कसे गरजेचे आहे, हे सोप्या शब्दात समजावून देणार आहेत. शिवाय ते विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले.शहरातही वापरावे लागणार हेल्मेटहेल्मेटसक्तीतून नगर पालिका तसेच महानगर पालिका अंतर्गत रस्त्याना सुट दिल्याचे बोलले जात होते. परंतु, पोलीस अधीक्षकांच्या सदर पत्राद्वारे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ अन्वये दुचाकी चालविणाऱ्या आणि तिच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविताना आयएसआय हेल्मेट प्रमाणित हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.या कलमांमध्ये सदर बाबतीत सुट देण्यात आलेली नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी या पत्राद्वारे जणू स्पष्टच केल्याचे दिसते.मोटर वाहन कायद्यान्वये होणार कारवाईविना हेल्मेट वाहन चालविताना आढळून आल्यास त्याचेवर मोटर वाहन कायदा १९८८ कलम १२९/१७७(अ) अन्वये तसेच वाहनचालविण्याचा परवाना शिवाय दुचाकी चालविल्यास वाहनचालक व मालक यांच्यावर मोटर वाहन कायदा १९८८ कलम १८० अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस