नऊ गावांचा कारभार पोलीस पाटलांविनाच
By Admin | Updated: August 10, 2014 23:10 IST2014-08-10T23:10:44+5:302014-08-10T23:10:44+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत ३० गावे येतात़ यातील काही गावे समुद्रपूर तालुक्यात तर काही सेलू तालुक्यात आहेत़ या ३० गावांपैकी सेलू व समुद्रपूर तालुक्यातील नऊ गावांमध्ये पोलीस पाटील नाहीत़

नऊ गावांचा कारभार पोलीस पाटलांविनाच
सिंदी (रेल्वे) : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत ३० गावे येतात़ यातील काही गावे समुद्रपूर तालुक्यात तर काही सेलू तालुक्यात आहेत़ या ३० गावांपैकी सेलू व समुद्रपूर तालुक्यातील नऊ गावांमध्ये पोलीस पाटील नाहीत़ यामुळे या गावांतील माहिती पोलीस ठाणे व तहसील कार्यालयांपर्यंत पोहोतच नाही़
सिंदी पोलीस ठाण्यांतर्गत सेलू तालुक्यातील खडकी, आमगाव, पिपरा ही तीन गावे तर समुद्रपूर तालुक्यातील भोसा, कांढळी, बरबडी, खुनी, धानोली, हिवरा (साखरा) येथे मागील पाच वर्षांपासून पोलीस पाटीतच देण्यात आलेला नाही़ सेलू तालुक्यातील खडकी येथील पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्याने ही जागा पाच वर्षांपासून रिक्त आहे़ आमगाव येथील पोलीस पाटील विश्वनाथ गणपतराव जांबुतकर २०११, पिपरा घनश्याम ढोबळे हे २०१४ ला सेवानिवृत्त झाल्याने पोलीस पाटलाची जागा रिक्त आहे़ समुद्रपूर तालुक्यात भोसा उत्तमराव गोस्वामी हे आठ वर्षांपूर्वी मरण पावल्याने पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे़ कांढळी येथील शिवदास वांदिले, बरबडी कवडू घोडे, खुनी येथील भालेराव झाडे, धानोली येथील अनंता बुजकूंडे, हिवरा (साखरा) येथील काशिनाथ थूल हे २०११, २०१२ ला सेवानिवृत्त झालेत़ तेव्हापासून अद्याप पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत़ ही पदे अद्यापही भरण्यात आलेली नाहीत़
पोलीस विभागामध्ये पोलीस ठाण्याचा दुवा समजले जाणारे पोलीस पाटील नऊ गावात नसल्याने अनेक समस्यांचा निपटारा करणे बिट जमादार व ठाणेदारांना अडचणीचे ठरत आहे़ सर्व बाबींचा ताण सुधीर निकम यांच्यावर आल्याचे सध्यातरी दिसून येत आहे़ योग्य वेळी सर्व खुफिया माहिती जमा करणे निकम यांना पोलीस पाटील कठीण ठरत आहे़ तेव्हा शासन, प्रशासन व पोलीस यंत्रणेने या बाबीची दखल घेत पोलीस पाटलांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)