विहिरीत पडून निलगाईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:14 IST2019-02-14T22:14:18+5:302019-02-14T22:14:39+5:30
पाण्याच्या शोधात आलेल्या निलगाईचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी चंदेवाणी शिवारात घडली. तालुक्यात ठिकठिकाणी जंगली जनावरे विहिरीत पडल्याच्या घटना घडत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसून येत आहे.

विहिरीत पडून निलगाईचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : पाण्याच्या शोधात आलेल्या निलगाईचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी चंदेवाणी शिवारात घडली. तालुक्यात ठिकठिकाणी जंगली जनावरे विहिरीत पडल्याच्या घटना घडत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसून येत आहे.
पुरुषोत्तम घोरमाडे यांचे चंदेवाणी शिवारात शेत असून त्यांच्या शेतातील विहिरीत बुधवारच्या रात्री निलगाय पडली होती. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कारंजा वनविभागाच्या रेस्कू टिमव्दारे निलगाईला जीवंत बाहेर काढण्यात आले. परंतू गंभीररीत्या जखमी झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान तिचा गुरुवारी दुपारी २ वाजता मृत्यू झाला. तालुक्यात पाणी प्रश्न निर्माण झाला असून पाण्याकरिता जंगली जनावरांची गावाकडे भटकंती सुरु आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात जनावरे विहिरीत पडल्याच्या घटना वाढत आहे.