देशाच्या एकात्मतेसाठी आजही नेहरुंच्या विचारांची गरज
By Admin | Updated: November 16, 2015 00:37 IST2015-11-16T00:37:34+5:302015-11-16T00:37:34+5:30
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत संपन्न घरातून सामाजिक कार्याची सुरुवात केली, तरीही ऐन तारुण्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी नऊ वेळा तुरुंगवास व हालअपष्टा भोगल्या.

देशाच्या एकात्मतेसाठी आजही नेहरुंच्या विचारांची गरज
अविनाश काकडे : काँग्रेस कमिटी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती कार्यक्रम
वर्धा : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत संपन्न घरातून सामाजिक कार्याची सुरुवात केली, तरीही ऐन तारुण्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी नऊ वेळा तुरुंगवास व हालअपष्टा भोगल्या. गांधी व नेहरु यांचे मुल्यांच्या बाबत संपूर्ण एकमत असले तरी काही भौतिक विकासाच्या बाबतीत त्यांचे मते पूर्णत: निराळी होती. आज मागे वळून पाहताना देशाच्या एकात्मतेसाठी नेहरूंच्या विचारांची खरी गरज असल्याचे मत किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी व्यक्त केली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय सभागृहात शनिवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अविनाश काकडे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे होते.
कार्यक्रमाचा परिचय व भूमिका सुंमत मानकर यांनी विषद केली. कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका अध्यक्ष सुनील कोल्हे यांनी विषद केली. नेहरूंच्या प्रतिमेला यावेळी सर्वांनी अभिवादन करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला प्रवीण हिवंज, इक्राम हुसैन, राजेंद्र शर्मा, ज्ञानेश्वर ढगे, सुमंत मानकर, भाऊराव काकडे, मंगेश शेंडे, महेश तेलरांधे, मनोज चांदुरकर, नितीन सराडे, अरमळ, लिलाधर त्रिमले, निळकंठ पिसे, दादा उगेमुगे, शैलेश येळणे, गौतम ताकसांडे, पुरुषोत्तम सावरकर, आशिष शिंदे, राहुल पाटील, विजय कल्याणी, विपीन राऊत, सुधीर वसु, विपीन राऊत, पिंटु ताकसांडे यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
चाईल्ड लाईनच्यावतीने बालक दिन साजरा
वर्धा- न्यूसिड चाईल्ड लाईन १०९८ वर्धा आणि नोडल अनिकेत समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जी.आर.पी. पोलीस स्टेशन वर्धा येथे बालक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बालकांनी जी.आर.पी सहायक पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर नालट, पोलीस कर्मचारी यांना सुरक्षा बंधन बांधून बालकांच्या संरक्षणाची हमी घेतली. यावेळी चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी व रिक्षा चालक यांना चार्ईल्ड लाईनविषयी माहिती दिली. तसेच चालविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाविषयीही माहिती दिली.
कार्याक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्युसिड चाईल्ड लाईन १०९८ वर्धाचे केंद्र समन्वयक आशिष मोडक, नोडलचे शहर समन्वयक सुमित धनवीज, प्रा. लोकेश नंदेश्वर तसेच चाईल्ड लाईन वर्धा समुपदेशक माधुरी शंभरकर टिम मेंबर प्रदीप वनकर, पुरुषोत्तम कांबळे, गजानन मडावी, अन्सार सैयद, जयश्री निवल, शीतल घोडराव, कविता लोखंडे यांनी सहकार्य केले. चाईल्ड लाईन आणि अनिकेत समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते २० या दरम्यान ‘चाईल्ड लाईन से दोस्ती सप्ताह’ हा उपक्रम राबविला जात आहे. विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेऊन बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल व त्यांचा विकास होईल या उद्देशाने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.