शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नीरजला अटक; वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:00 AM

या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे. परंतु, पोलिसांच्या कारवाईमुळे वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला सध्यातरी काही काळाकरिता ब्रेक लागल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी पोलीस ठाण्यात अवैध गर्भपातप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असताना शनिवारी आर्वी पोलिसांना डॉ. नीरज कदम यांच्या हॉस्पिटलच्या वरील खोलीत वन्यजीवाची कातडी सापडली. त्यानंतर आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी आर्वीच्या वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अवैध गर्भपाताचा अड्डा असलेले आर्वीचे कदम हॉस्पिटल गाठून ती वन्यजीवाची कातडी ताब्यात घेतली. बारकाईने पाहणी केली असता ही कातडी मादी काळवीटाची असल्याचे पुढे आल्याने डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे. परंतु, पोलिसांच्या कारवाईमुळे वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला सध्यातरी काही काळाकरिता ब्रेक लागल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सखोल चौकशीअंती होणार कलमवाढ?-    काळवीटाची कातडी घरात असतानाही त्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या डॉ. नीरज कदम यांच्यावर आर्वीच्या वनविभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या इतर कलमांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शनिवारी काळवीटाची कातडी जप्त करीत डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशीअंती काय वास्तव बाहेर येते त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- नितीन जाधव,  वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग