शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशभक्तीने भारावलेल्या सक्षम युवा पिढीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:01 IST

आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याकरिता सैन्यदल सक्षम आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : स्काऊट आणि गाईडचा अभिनंदन सोहळा

आॅनलाईन लोकमतवर्धा : आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याकरिता सैन्यदल सक्षम आहे. प्रगत राष्ट्रात  सैनिकी प्रशिक्षण आवश्यक केलेले असल्याने येथे प्रत्येक नागरिक देशासाठी सर्व काही करण्याच्या भावनेने प्रेरित झालेला आहे. एनसीसी, स्काऊट गाईडच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन देशासाठी सक्षम युवा पिढी घडविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.वर्धा जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड यांच्यावतीने स्काऊट-गाईडमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात राज्य व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ११० कब-बुलबुल, स्काऊट्स, गाईड्स व रोव्हर्स, ५ स्काऊटर, ५ गाईडर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, स्काऊस-गाईडचे जिल्हाध्यक्ष सतीश राऊत, सामाजिक कार्यकर्ते इमरान राही, अनिल नरेडी, जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे, स्काऊटचे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर, सुवर्णमाला थेरे, राज्य आयुक्त शकुंतला चौधरी, जिल्हा सरचिटणीस रामभाऊ बाचले आदी उपस्थित होते.याप्रसंगी एनसीसीचे कमांडर कर्नल अमिताभ सिंग, प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे, स्काऊटचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, शीला पंचारिया, लिडर ट्रेनर उमाकांत नेरकर, जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, मंजूषा जाधव व नागपूर संघटक वैशाली अवथळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना खा. तडस म्हणाले की, स्काऊटस-गाईडसचा उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे. भावी सुजाण नागरिक घडविण्यात महत्त्वाचा वाटा आहे. स्काऊट्स आणि गाईडसचा राज्य मेळावा वर्धा शहरात आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. शिवाय १० रोव्हर्स आणि रेंजर्सना दिल्लीच्या राजपथावर पार पडणारा प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यासाठी विमानाने नेण्याचेही यावेळी जाहीर केले.जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांनी प्रास्ताविकातून अभिनंदन सोहळ्याबाबत माहिती दिली. जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे यांनी स्काऊट्स आणि गाईड्स चळवळीबाबत माहिती दिली. संगीत शिक्षक अजय हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश हायस्कूलच्या स्काऊट्स आणि गाईड्सने स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन रेंजर कोमल गोमासे हिने केले तर उपस्थितांचे आभार स्कॉऊटचे जिल्हाध्यक्ष सतीश राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता पंकज घोडमारे, रोव्हर लिडर संतोष तुरक, सुनील खासरे, भरत सोनटक्के, सतीश इंगोले, रेणूका भोयर, उर्मिला चौधरी, विवेक कहाळे, संजय केवदे, रितेश जयस्वाल, सुषमा कार्लेकर, अभय गुजरकर, रेंजर सपना बनसोड, प्रगती मेलेकर, कविता शिंदे, स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी तसेच देवळीच्या एसएसएनजे महाविद्यालयाच्या रोव्हर्स व रेंजर्संनी सहकार्य केले.सैनिकी प्रशिक्षणाने लागते शिस्तस्काऊट आणि गाईडचे प्रशिक्षण घेताना सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण स्काऊट, गाईड, रोव्हर, रेंजरमध्ये शिस्त निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम करते. देशाचे सैन्यदल सक्षम करण्याकरिताही सैनिकी प्रशिक्षणाची गरज असते. या प्रशिक्षणातूनच देशाप्रती सर्वकाही अर्पण करण्याची भावना जागृत होते, अशी मतेही कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलीत. याप्रसंगी विद्यार्थी तथा शाळा, महाविद्यालयांचाही मान्यवरांकडून गौरव करण्यात आला.