टोळधाड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:17+5:30
टोळघाट ही किड आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. ही किड अंत्यत खादाड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. वाळवंटी टोळ ही किड मोठ्या प्रमाणात उभ्या पिकाचे तसेच इतर वनस्पतीचे नुकसान करते. या किडीच्या दोन अवस्था आहेत. जेव्हा ही किड एकट्या अवस्थेत असते तेव्हा तिला एकाकी अवस्था म्हणतात.

टोळधाड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : टोळधाड संकट विदर्भात पोहोचले आहे. ही किड खादाड व मोठे नुकसान करणारी असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे, असे मत सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी मांडले आहे.
टोळघाट ही किड आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. ही किड अंत्यत खादाड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. वाळवंटी टोळ ही किड मोठ्या प्रमाणात उभ्या पिकाचे तसेच इतर वनस्पतीचे नुकसान करते. या किडीच्या दोन अवस्था आहेत. जेव्हा ही किड एकट्या अवस्थेत असते तेव्हा तिला एकाकी अवस्था म्हणतात. तर जेव्हा ही किड सामूहिक आढळून येते तेव्हा तिला समूह अवस्था म्हणतात. समुह अवस्थेत ही किड आष्टी तालुक्यात आढळून आली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टोळधाडीची सवय थव्याथव्याने एका दिशेने उडत जाण्याची असते. त्यामुळे पुढे येणाऱ्या थव्याच्या लाटेवर ६० से.मी. रुंद व ७५ सें.मी. खोल चर खोदून त्यात टोळधाडीच्या पिलांना पकडून नष्ट करता येते. दिवसा ही किड शेतात आढळल्यास थाळी, ढोल, ताशा, डब्बे जोरात वाजवावे. जेणेकरून या किडीला शेतातून हाकलून लावता येईल. टोळधाडीची अंडी घातलेली जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करून नियंत्रण करता येते. सायंकाळी किंवा रात्री झाडांवर टोळ जमा होतात, अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून धूर केल्यास या किडीवर नियंत्रण मिळविला येते. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित किटकनाशक अझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ३० मि.ली. किंवा ५ टक्के निंबोळी अर्क प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फ्रिप्रोनिल ५ एस. पी. ३ मि.ली. मिसळावे. याचे ढिग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होतात आणि किडनाशकामुळे ते मरतात. मिथिल पॅराथियॉन २ टक्के भुकटी २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी धूरळणी करावी, असे डॉ. उंबरकर यांनी सुचविले आहे.