शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

युवा चळवळ सक्रिय करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:12 AM

भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : युवा स्वयंसेवकांच्या कार्य शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले. नेहरू युवा केंद्र व प्रहार समाज जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय युवा स्वयंसेवकांसाठी कार्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बुधवारी बोलत होते.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे माजी जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, तालुका क्रीडा अधिकारी पुरूषोतम दारव्हणकर, प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा लेखापाल दयाराम रामटेके, रविंद्र काकडे उपस्थित होते.युवा स्वयंसेवकांसाठी कार्य शिबिरात जिल्ह्यातील निवडक ६० युवक युवती सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहा युवा संघ तयार करण्यात आली होती व त्यांना समाज सेवकांची नावे देण्यात आली होती. ज्यात तुषार झाडे यांनी बाबा आमटे युवा मंडळाचे, शैलेश आगलावे यांनी सुंदरलाल बहुगुणा युवा मंडळ, गायत्री निरगुडे, पोपटराव पवार युवा मंडळ, रंजित कापसे यांनी बाबा आमटे युवा मंडळ, ओम प्रकाश बधरिया यांनी मेधा पाटकर युवा मंडळ, नितेश महाकाळकर यांनी देवाजी तोफा युवा मंडळ तर शुभांगी ढाले यांनी अण्णा हजारे युवा मंडळाचे नेतृत्व केले.शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी अ‍ॅडव्हेंचर हिल्सवरील पावसाचे पाणी अडविण्याकरिता २०० मिटर खंदक खोदला. याशिवाय परिसरातील गाजर गवत निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा या विषयावर पथनाट्य, पाणी बचतीबाबत परिसरातील घरोघरी जावून जनजागृती वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी प्रहार संस्थेचे २१ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षण, रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग, प्रश्न मंजुषा, गटचर्चा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा व विविध साहसी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.बौध्दिक सत्रात वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रा.सी.बी. देशमुख, जिल्हा स्काऊटर दत्तराज भिष्णुरकर, गाईड संघटक वैशाली अवथळे, संतोष तुरक व रविंद्र गुजरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवधन शर्मा यांनी केले. याप्रसंगी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर व संजय माटे यांनी विचार प्रकट केले. संकेत हिवंज व जयश्री भोयर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन जयश्री भोयर तर आभार रंजीत कापसे यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी