शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नवरगावचे होणार पुनर्वसन

By admin | Updated: September 24, 2016 02:18 IST

सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या नवरगाव या गावचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

खडकी येथे २० एकर जागा : पुनर्वसित बाधितांना आमदारांच्या हस्ते धनादेशवर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या नवरगाव या गावचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या गावातील ज्यांचे पुनर्वन होणार आहे अशांना आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते धनादेशचे वितरण करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्पाचे नव्याने सिमांकन करण्यात आले आहे. न्यू बोर व जुना बोर मिळून नवीन व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने नव्याने जंगलव्याप्त जमीन व गावे अधिग्रहीन केली आहेत. नवरगाव व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध असल्याने गावाचे अधिग्रहण करण्यात येऊन खडकी येथे त्या गावाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत येथील शेतकऱ्यांना चार पट मोबदला देण्यात येत आहे. यात प्रति एकर ७ लाख २० हजार रुपये याप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. वनविभागाने प्रथमच पुनर्वसनासाठी स्वामालकीची खडकी येथील २० हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. पुनर्वसनात गाव सोडणाऱ्या नागरिकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक दिगंबर पगार, सहायक वनसंरक्षक जी.पी. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी न्यू बोर अभयारण्य जी.एफ. लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर, वनपरिक्षेत्र अधिकारी बाडे, क्षेत्र सहायक फाटे, शिरपूरकर, सोडगीर, सरपंच गिता कडूकर, पं.स. सदस्य अशोक कलोडे, भारतीय जनता किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास बरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक रतनवार, माजी जि.प. सदस्य साहेबराव उईके, मनीष बोपचे, ग्रामसेवक सुहास लंगडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)