शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या

By admin | Updated: July 1, 2014 23:38 IST

महाराष्ट्र मानबिंदु असलेल्या पुणे विद्यापीठाच्या परिसरातच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक शैक्षणिक कार्य सर्व परिचितच आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची नव्या पिढीला

मागणी : महात्मा फुले समता परिषदेचे प्रशासनाला निवेदनवर्धा : महाराष्ट्र मानबिंदु असलेल्या पुणे विद्यापीठाच्या परिसरातच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक शैक्षणिक कार्य सर्व परिचितच आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची नव्या पिढीला सतत प्रेरणा मिळावी म्हणून पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव द्यावे अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यासंदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांना देण्यात आली. या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषद व विविध संघटनांनी अनेकवार आंदोलने केली आहेत. त्यामुळे सहा महिन्यापूर्वीच पुणे विद्यापीठाला कार्यकारी परिषदेने, पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव द्यावे असा ठराव मंजूर केला व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र महाराष्ट्र शासनाने याची उपेक्षा करुन अजूनही हा ठराव मंत्रीमंडळासमोर मांडला नाही व त्याला मंजुरी दिलेली नाही.त्यामुळे शासनाने आठ दिवसाच्या आत पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळात मांडून मंजूर करावा व तशी अधिसूचना काढावी, अन्यथा या साठी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येईल असा इशारा, महात्मा फुले समता परिषदेने मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केलेला आहे. हे निवेदन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे व परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिले.यापूर्वी महाराष्ट्र शासनाने पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव देण्यासाठी महिन्याभरात मंजुरी देवून अधिसुचना काढु असे सांगितले होते. परंतु सहा महिने होवून, आता विधानसभेचा कालावधी संपत असताना सुद्धा या शासनाला अजून जाग येत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेवून त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार करतो असे एकीकडे सांगायचे, आणि दुसरीकडे याच महापुरुषांची उपेक्षा करायची अशी शासनाची दुटप्पी भुमिका आहे. त्याच प्रमाणे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याला बहिणबाई चौधरी यांची नवे द्यावी अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे. निवेदनाच्या प्रति शरद पवार, छगन भुजबळ, राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व प्रधान सचिव उच्च व शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. निवेदन देताना फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, संजय मस्के, किशोर तितरे, निळकंठ पिसे, सुधीर पांगुळ, वनिता धांमदे, अर्चना मोरे, सुनील कोल्हे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)