शांती मोर्चातून नोंदविला मुस्लीम बांधवांनी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:24+5:30
शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

शांती मोर्चातून नोंदविला मुस्लीम बांधवांनी निषेध
आर्वी : केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे ठरत असून या विधेयकावर सरकारने पुर्नविचार करावा, अशी मागणी मुस्लिम एकता मंचच्यावतीने काढण्यात आलेल्या शांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सदर आंदोलनादरम्यान उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. धर्माच्या आधारावर विभाजन करणारे हे विधेयक ठरत असल्याने त्यावर पुर्नविचार करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
मेहबूब कुरेशी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मुन्ना बाबा कादरी, जावेद कादरी, मौलाना जावेद कादरी, अयुब खान, तब्बू हसन, मोहम्मद इरफान, कपूर बाबू, सज्जाद खान, प्यारेभाई कुरेशी, शब्बीर अहमद, अकील कुरेशी, अलीम पटेल, जाकीर हुसेन, अब्दूल तनवीर, अशरफ मोहम्मद, साबीर अली, हाजी वकील साहब, वयद खान, शेख मुकबल मंसुरी, शहजाद कुरेशी, मुंशी अहमद, सय्यद जुनेद, रहीमभाई कुरेशी, मोहम्मद जफर, युनुस अहमद शहा, शेख असलम खान आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.