पुलगावात दिवसाढवळ्या महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:43 IST2018-09-15T23:43:04+5:302018-09-15T23:43:34+5:30
पुलगाव येथील पोलीस वसाहतीतील रहिवासी असलेल्या भारती धीरज जांभुळकर (४०) हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्याच घरात शनिवारी दुपारी आढळून आला.

पुलगावात दिवसाढवळ्या महिलेची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलगाव येथील पोलीस वसाहतीतील रहिवासी असलेल्या भारती धीरज जांभुळकर (४०) हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्याच घरात शनिवारी दुपारी आढळून आला. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती हिचा पती धीरज हा रेल्वे विभागात कार्यरत आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ड्युटीवर गेले होते. तर भारतीची मुलगी शेगाव येथे गेल्याने घटनेच्यावेळी घरी केवळ भारती हजर होती. याच दरम्यान कुणीतरी अज्ञात मारेकऱ्याने भारती जांभुळकर यांच्या घरात प्रवेश करून तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. शनिवारी दुपारी धीरज हा घरी जेवण करण्यासाठी आला असता त्याला भारतीचा मृतदेह रक्तीने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या चमुलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या एलसीबीची दोन तर पुलगाव पोलिसांची दोन अशी एकूण चार चमू रवाना झाले आहेत.