कुऱ्हाडीने मारहाण करून इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:39 IST2018-08-08T00:36:29+5:302018-08-08T00:39:43+5:30
तक्रार दिल्याचा वचपा काढण्यासाठी तिघांकडून एकास कुºहाडीने बेदम मारहाण करण्यात आली. यात संजय रामकृष्ण माकोडे (५५) रा. हनुमान वॉर्ड याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अवघ्या चार तासातच बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

कुऱ्हाडीने मारहाण करून इसमाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तक्रार दिल्याचा वचपा काढण्यासाठी तिघांकडून एकास कुºहाडीने बेदम मारहाण करण्यात आली. यात संजय रामकृष्ण माकोडे (५५) रा. हनुमान वॉर्ड याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अवघ्या चार तासातच बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. श्याम ज्ञानेश्वर सोनवणे (२५), नितेश शेषराव उईके (२७) व सावंत प्रमोद वलके (२८) सर्व रा. आर्वी असे अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानूसार, श्याम सोनवणे याचे वडिल एका मुकबधीर विद्यालयात चौकीदार म्हणून कार्यरत आहे. ते बहूदा कामावर राहत नसल्याची तक्रार मृतक संजय माकोडे याने संबंधितांकडे केली होती. याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी मौजा सारंगपुरी तलावाजवळील वीट भट्टीवर चौकीदार म्हणून कार्यरत असलेल्या संजय माकोडे यांच्या घरात प्रवेश करून त्याला श्याम सोनवणे, नितेश उईके व सावंत वलके यांनी कुऱ्हाडीने मारहाण करून ठार केले. शिवाय तेथून पळ काढला.
सकाळी ही घटना निदर्शनास येताच आर्वी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राप्त माहितीवरून आर्वी पोलिसांच्या चमुने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांची चमु व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सदर प्रकरणी रवींद्र बुले यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून काही संशयीतांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेवून विचारणा केली. याच विचारपुसदरम्यान श्याम सोनवणे, नितेश उईके व सावंत वलके यांनी संजय माकोडे याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण करीत आहेत.