शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्यातून ‘त्या’ इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे याला खात्रिदायक माहितीच्या आधारे ताब्यात घेत विचारपूस केली.

ठळक मुद्देआरोपी अटक : काठीने डोक्यावर जबर प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : नजीकच्या सोनेगाव (खुनकर) येथील रहिवासी गजानन गणपत आडे (५५) याच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे (४८) रा. सोनेगाव (खु.) याला पोलिसांनी अटक केली असून जादूटोण्याच्या संशयातून गजाननची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे याला खात्रिदायक माहितीच्या आधारे ताब्यात घेत विचारपूस केली. सुरूवातील उडवा-उडवीचे उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी हिसका मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी व मुलगा याच्यावर करनी केल्याचा ठपका ठेऊन गजाननला आपणच काठीने मारहाण केल्याचे आरोपी देविदास याने पोलिसांना सांगितले आहे.या प्रकरणातील आरोपी देविदास याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला अल्लीपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या आरोपीची पोलीस कोठडी पोलिसांनी मिळविली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखेडे, पोहवा नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे यांनी केली.

टॅग्स :Murderखून